कॉफी फेशियल

वाढत्या वयानुसार, चेहऱ्याची नैसर्गिक चमक आणि लवचिकता टिकवून ठेवण्यासाठी घरच्या घरी फेशियल करून महागड्या पार्लर ट्रिटमेंटसारखा ग्लो सहज मिळू शकतो.

Published by: स्नेहल पावनाक
Image Source: istock

स्टेप 1

एक चमचा कॉफीमध्ये अर्धा चमचा मध मिसळा आणि या पेस्टचा स्क्रबप्रमाणे वापर करुन चेहरा पूर्णपणे एक्सफोलिएट करा.

Published by: स्नेहल पावनाक
Image Source: istock

स्टेप 2

आता चेहरा स्वच्छ केल्यानंतर एका चमचा कॉफी, एक चमचा बेसन, थोडा लिंबाचा रस, एक चिमूटभर हळद आणि दही मिसळा आणि या पेस्टने चेहऱ्यावर आणि मानेला मसाज करा.

Published by: स्नेहल पावनाक
Image Source: istock

स्टेप 3

मसाज केल्यानंतर, हा फेस पॅक थोडासा कोरडा होऊ द्या, नंतर साध्या पाण्याने चेहरा पूर्णपणे स्वच्छ करा.

Published by: स्नेहल पावनाक
Image Source: istock

स्टेप 4

आता कॉफीमध्ये एलोवेरा जेल आणि 1 व्हिटॅमिन ई कॅप्सूल मिसळा आणि पेस्ट बनवा.

Published by: स्नेहल पावनाक
Image Source: istock

स्टेप 5

ही पेस्ट चेहरा आणि मानेला लावा आणि हलक्या हातांनी सुमारे 5 ते 7 मिनिटे मसाज करा.

Published by: स्नेहल पावनाक
Image Source: istock

स्टेप 6

मसाज केल्यानंतर, हा पॅक पूर्णपणे कोरडे होईपर्यंत चेहऱ्यावर राहू द्या आणि डोळे मिटून शांत बसा. यावेळी डोळ्यावर काकडी किंवा कापसाच्या गोळ्याला गुलाब पाणी लावून ते डोळ्यावर ठेवू शकता.

Published by: स्नेहल पावनाक
Image Source: istock

स्टेप 7

आता पॅक ओल्या टॉवेलने किंवा टिश्यूने पुसून टाका आणि नंतर साध्या पाण्याने चेहरा पूर्णपणे स्वच्छ धुवा.

Published by: स्नेहल पावनाक
Image Source: istock

परफेक्ट ग्लो

हे फेशियन केल्यानंतरचा ग्लो पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल की, हा पार्लरसारखा ग्लो तुम्हाला इतक्या कमी खर्चात मिळाला आहे.

Published by: स्नेहल पावनाक
Image Source: istock

टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. कोणताही उपाय किंवा तज्ज्ञ किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावीत.

Published by: स्नेहल पावनाक
Image Source: istock