तृतीयपंथीयांचं एका रात्रीसाठी लग्न होतं आणि दुसऱ्या दिवशी ते विधवेप्रमाणे शोक करतात.
तृतीयपंथी समाजात अनेक प्रथा प्रचलित आहेत, त्यापैकी एक लग्नासंबंधित आहे.
तृतीयपंथी व्यक्तीला एका रात्रीसाठी लग्न करावं लागतं, पण हे लग्न नेमकं कुणासोबत आणि का होतं माहितीय?
इतकंच नाही, तर लग्नानंतर दुसऱ्या दिवशी त्या विधवेप्रमाणे शोक आणि दु:ख व्यक्त करतात.
तृतीयपंथी समाज भगवान इरावन यांना कुलदैवत मानतात आणि त्यांच्यासोबत एका रात्रीसाठी लग्न करतात.
इरावन अर्जुन पुत्र होते. पौराणिक मान्यतांनुसार, महाभारत युद्धाआधी विजयासाठी पांडवांनी कालिमातेची पुजा केली होती. या पुजेसाठी राजकुमाराची बळी देणं आवश्यक होतं.
अशा वेळी अर्जून पुत्राने बळी दिला होता पण, त्याआधी त्यांची अट होती की, मरणाआधी त्यांना विवाह करायचा आहे.
त्यावेळी पांडवांसाठी मोठी समस्या होती की, अशी कोणती राजकुमारी आहे जी, एका दिवसासाठी लग्न करेल आणि दुसऱ्या दिवशी विधवा होईल.
श्रीकृष्णाने या समस्येवर उपाय शोधला. इरावनची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी मोहिनी रूप धारण केलं आणि इरावनशी लग्न केलं.
दुसऱ्या दिवशी इरावणाचा बळी दिला गेला आणि श्रीकृष्णाने मोहिनी रुपात विधवा म्हणून शोक केला. याच घटनेनंतर तृतीयपंथी इरावनला आपला देव मानतात आणि एका रात्रीसाठी भगवान इरावनशी लग्न करतात.
टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. वरील माहिती प्रचलित कथांवर आधारित आहे. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही.