गर्भवती महिलांसाठी लसूण फायदेशीर मानला जातो कारण त्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन्स आणि खनिजं मुबलक प्रमाणात असतात.

यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते, रक्तदाब नियंत्रणात राहतो आणि पचन सुधारतं.

Published by: अदिती पोटे, एबीपी माझा

गर्भावस्थेत बद्धकोष्ठता आणि अपचन ही सामान्य समस्या असते. लसूण पचन सुधारतो आणि गॅस, अजीर्ण यापासून आराम देतो.

मात्र, कच्चा लसूण जास्त प्रमाणात खाल्ल्यास अ‍ॅसिडिटी, मळमळ किंवा जुलाब होऊ शकतात.

शिवाय रक्त पातळ करण्याची क्षमता असल्यामुळे गर्भारपणाच्या शेवटच्या टप्प्यात लसूण जास्त खाणं टाळावं.

Published by: अदिती पोटे, एबीपी माझा

त्यामुळे गर्भवती महिलांनी मर्यादित प्रमाणात (दररोज १-२ पाकळ्या शिजवलेल्या स्वरूपात) लसूण सेवन करावं

मात्र प्रत्येक स्त्रीचा शरीरप्रकार वेगळा असतो. एखाद्याला लसूण पचतो, तर एखाद्याला त्रास होतो. त्यामुळे लसूण खाल्ल्यावर त्रास जाणवल्यास लगेच थांबवावा.

गर्भवती महिलांसाठी लसूण हा फायदेशीर ठरू शकतो, पण किती प्रमाणात घ्यावा आणि कोणत्या स्वरूपात घ्यावा हे डॉक्टरांच्या सल्ल्याने ठरवणं सर्वात योग्य आहे.