असं म्हणतात, प्रेमाचा धागा हा अत्यंत नाजूक असतो. कारण नातं हे विश्वासाच्या आधारावर उभं असतं.
अगदी घट्ट आणि वर्षानुवर्षे जुने नातंही तुटायला लागलं की एकमेकांचे चांगले गुणही वाईट वाटायला लागतात.
तुटलेले नाते पुन्हा कसे उभारायचे ते जाणून घ्या.
नात्यात बराच वेळ एकत्र घालवताना गैरसमज होणे सामान्य आहे. पण जर ते वेळेवर संपले नाहीत तर ते नाते तुटण्याचे सर्वात मोठे कारण ठरते.
जर तुमच्या दोघांमध्ये काही गैरसमज असेल तर त्याबद्दल तुमच्या जोडीदारासोबत मोकळेपणाने बोला.
कोणी कितीही जवळचे असले तरी त्यांना वैयक्तिक स्पेस हवी असते.
एकमेकांमध्ये खूप भांडण किंवा वाद होत असतील तर काही काळ एकमेकांना स्पेस द्या.
यामुळे तुमचा जोडीदार तुम्हाला मिस करेल आणि नातं सुधारण्याचा प्रयत्न करू लागेल.
भांडणाच्या वेळीच जोडीदाराला दोष देऊ नका. शांत झाल्यावर तुमच्या चुका समजून घ्या. तसेच जोडीदारासमोर तुमची चूक मान्य करा.
तुमच्या जोडीदाराला वेळोवेळी जाणवून द्या की तो तुमच्यासाठी खास आहे.
यासाठी जर तुम्हाला स्वतःमध्ये काही बदल करावे लागतील तर अजिबात संकोच करू नका.