पावसाळ्यात केसांशी संबंधित समस्या अधिक वाढतात. या दिवसात हवेत ओलावा असतो, त्यामुळे केस चिकट होणे, कोंडा होणे किंवा केस गळणे अशा समस्या दिसून येतात. केसांची योग्य काळजी घेऊ शकता आणि त्यांच्याशी संबंधित सर्व समस्या टाळू शकता. जाणून घ्या.. पावसाळ्यात केसांना तेल लावणे खूप गरजेचे आहे. केसांची मुळे मजबूत करण्याचा हा उत्तम उपाय आहे आणि स्कॅल्पही निरोगी ठेवतो. रात्री तेलाने मसाज करा आणि सकाळी चांगल्या शाम्पूने केस धुवा. शॅम्पूनंतर कंडिशनर करणं सोडू नका, कारण कंडिशनिंग केल्याने केस फ्रिज राहतात. ओले केस विंचरू नका, कारण यामुळे केसांतील भांग कमकुवत होतात आणि केस गळतीला अधिक चालना मिळते. जर तुम्ही ओले केस पुसण्यासाठी कॉटन टॉवेल वापरत असाल तर तुम्ही हे देखील टाळले पाहिजे. पावसाळ्यात मायक्रो टॉवेलचा वापर तुमच्यासाठी उत्तम ठरू शकतो.