3 ऑक्टोबरपासून नवरात्रोत्सवला सुरूवार होत आहे, देवीच्या आगमनाची घराघरात जय्यत तयारी सुरू आहे. साबुदाणा नीट धुवून सुमारे 5 तास पाण्यात भिजत ठेवा. पुरेसे पाणी आहे हे लक्षात ठेवा, नाहीतर साबुदाणा जास्त भिजून गरगट होऊ शकतो. साबुदाणा चांगला भिजवून मऊ झाल्यावर अतिरिक्त पाणी काढून टाकावे. उकडलेले बटाटे मॅश करा. नंतर एका मोठ्या भांड्यात साबुदाणा, मॅश केलेले बटाटे, शेंगदाणे, हिरवी मिरची, आले, जिरे, कोथिंबीर आणि खडे मीठ घाला. आता त्यात लिंबाचा रस घाला आणि सर्व साहित्य चांगले मिसळा. मिश्रण एकसारखे ढवळावे जेणेकरून सर्व मसाले चांगले मिसळतील. या मिश्रणाला लहान गोल वड्यांचा आकार द्या. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही त्यांचे चपटे वडेही बनवू शकता. कढईत तेल गरम करा. तेल गरम झाल्यावर त्यात वडे टाका आणि मध्यम आचेवर सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळा. तेल गरम झाल्यावर त्यात वडे टाका आणि मध्यम आचेवर सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळा. दोन्ही बाजू सोनेरी झाल्या की तव्यातून वडे काढून टिश्यू पेपरवर तेल शोषण्यासाठी ठेवा. साबुदाणा वडा तयार आहे. हिरवी चटणी, दही किंवा चहासोबत गरमागरम सर्व्ह करा.