सोप्प्या पद्धतीने उकडीचे मोदक बनवण्याची पद्धत:

Published by: abp majha web team
Image Source: Instagram/ cookininshort

एका पॅनमध्ये तूप गरम करून त्यात किसलेला नारळ घालावा. नारळ थोडासा परतल्यावर त्यात किसलेला गूळ टाकावा.

Image Source: Instagram/ cookininshort

गॅस बंद करून ४–५ मिनिटं तसेच ठेवावं.नंतर झाकण काढून ओल्या हाताने किंवा तुपाच्या हाताने पीठ चांगलं मळून घ्यावं.

Image Source: Instagram/ cookininshort

गूळ वितळून नारळात मुरला की मिश्रण थोडं घट्ट होऊ द्यावं. शेवटी वेलची पूड घालून नीट ढवळावे.हे सारण थंड करून बाजूला ठेवावे.

Image Source: Instagram/ cookininshort

एका पातेल्यात पाणी गरम करून त्यात मीठ आणि थोडं तूप टाकावं.पाणी उकळायला लागलं की त्यात तांदळाचं पीठ टाकून झाकण ठेवावं.

Image Source: Instagram/ cookininshort

हाताला पाणी लावून पीठाचा गोळा घेऊन तो पातळ आणि गोलसर पुरीसारखा थापावा. त्यात तयार केलेलं सारण ठेवावं.

Image Source: Instagram/ cookininshort

आता कडा एकत्र करून मोदकाच्या आकारात गुंडाळावं. (हवे असल्यास मोदक साचा वापरू शकता.)अशा प्रकारे सर्व मोदक घडवून घ्यावेत.

Image Source: Instagram/ cookininshort

एका पातेल्यात किंवा इडली कुकरमध्ये पाणी गरम करावे.त्यावर मोदक ठेवण्यासाठी चलनी किंवा मोदक पात्र ठेवावे.

Image Source: Instagram/ cookininshort

मोदक १०–१२ मिनिटे वाफवून घ्यावेत.वाफवल्यावर मोदकावर थोडंसं तूप सोडावं.

Image Source: Instagram/ cookininshort