तुळशीसाठी कायम मातीच्या कुंडीची किवा मातीच्या वृंदावनाची निवड करावी.
तुळशीला कोणतीही माती चालते पण सगळ्या पोषक तत्त्वांमुळे तुळशीचं आरोग्य चांगलं राहतं.
घरगुती पद्धतीनं तुळस लावत असाल तर कडुलिंबाची पानं शक्य असेल तर शेणखत देणं चांगलं ठरतं.
तुळशीच्या रोपाला साधारण ४ ते ५ तास स्वच्छ सुर्यप्रकाशात ठेवण्याची गरज असते.
पाणी घालताना तुळशीला एक दिवसाआड पाणी घालणे योग्य असते आणि पाणी घालताना पानांवर कधीच टाकू नये.