घरच्या घरी कसं बनवाल चटपटीत पंचरत्न लोणचं?

Published by: श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई
Image Source: paxels

हिवाळा असो वा उन्हाळा, कोणत्याही ऋतूत जेवणासोबत लोणचं म्हणजे, उत्तम बेत.

Image Source: paxels

पंचरत्न लोणचं बाजारात सहज मिळतं, पण ते घरी कसं बनवायचं, हे आज आपण पाहूया.

Image Source: paxels

पंचरत्न लोणचं फक्त पाच भाज्यांपासून बनवलं जातं, ज्यात गाजर, आवळा, आलं, लसूण आणि हिरवी मिरची असते.

Image Source: paxels

सर्वात आधी सर्व गोष्टी 2 गाजर, 7-8 आवळा, 25-30 ग्रॅम आले, अंदाजे 100 ग्रॅम लसूण आणि 100 ग्रॅम हिरवी मिरची बारीक तुकड्यांमध्ये कापा

Image Source: paxels

आता तुम्हाला मसाला तयार करायचा आहे, ज्यामध्ये अंदाजे 3 चमचे जिरे, 3 चमचे बडीशेप, 3 चमचे मेथी, 2-4 लवंगा आणि 1 चमचा काळी मिरी लागतील.

Image Source: paxels

या सर्वांना हलके तळून घ्या, तळल्यानंतर थंड करून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या, तुमचा खडा मसाला तयार आहे.

Image Source: paxels

कढईत थोडे मोहरीचे तेल टाका आणि ते पूर्ण गरम झाल्यावर वाटलेला मसाला घाला, मग चिरलेल्या भाज्याही त्यात टाका.

त्यानंतर, त्यात 2 चमचे लाल मिरची पावडर आणि 2 चमचे मीठ घाला, तसेच चांगले ढवळा आणि मग गॅसवरून उतरवा.

पूर्णपणे थंड होण्याची प्रतीक्षा करा, आता व्हिनेगर घाला ज्यामुळे आंबटपणा येतो आणि शेल्फ लाइफ देखील वाढते, आणि नंतर काचेच्या बरणीत भरून ठेवा.

Image Source: paxels