या बिअर पावडरचा वापर करुन तुम्ही सहज घरच्या घरी अवघ्या दोन मिनिटांमध्ये थंडगार बिअर तयार करु शकता. जर्मनीतील एका कंपनीने ही बिअर पावडर बनवली आहे. अशा प्रकारचा हा पहिला शोध असून ही जगातील पहिली बिअर पावडर आहे. याआधी कधीही पावडर स्वरूपात बिअर बनवली गेली नव्हती. तुम्ही फक्त दोन चमचे पावडर थंड पाण्यात मिसळा आणि तुमची थंडगार बिअर तयार आहे. यासोबतच हे पर्यावरणासाठीही खूप फायदेशीर आहे, कारण पावडर बिअर बनवताना जास्त कार्बन उत्सर्जन होत नाही. बिअर पावडरचा वापर करुन तुम्ही दोन मिनिटांत तुमची बिअर तयार होईल. बिअर बनवणाऱ्या कंपनीनं सांगितलं की, तुम्ही ही बिअर पावडर खरेदी करून ठेवू शकता आणि तुम्हाला पाहिजे तेव्हा यापासून बिअर बनवून त्याचा आनंद घेऊ शकता.