चांगल्या आरोग्यासाठी संतुलित आहार गरजेचा आहे. आहारात फळं भाज्यांसह मेथीच्या दाण्यांचा समावेश केल्यानं अनेक फायदे होतात. पोटॅशियम, फायबर, लोह, कॅल्शियम, विटामिन डी आणि सी इत्यादी घटक असल्यामुळे 14 दिवसांपर्यंत मेथीचे दाणे खाल्ले तर शरीरावर खूप चांगला परिणाम होतो. तज्ञांच्या मते, मेथीच्या दाण्यांनी रक्ताची कमतरता दूर होऊन कोलेस्ट्रोलची पातळी कमी होण्यास मदत होते. मेथीच्या दाण्यांमध्ये फायबरचे प्रमाण अधिक असल्यानं बद्धकोष्ठतेची समस्या कमी होते. मेथीच्या दाण्यांमध्ये उच्च फायबर सामग्री असल्यामुळे आतड्यांच्या हालचालीचे योग्य नियमन करण्यास मदत होते व आतड्यांचे आरोग्य सुधारते. मधुमेहींच्या साखरेची पातळी योग्य राहण्यास मेथीच्या दाण्यांचा फायदा होतो. यासाठी चमचाभर मेथी रात्रभर पाण्यात भिजवून दुसऱ्या दिवशी सकाळी रिकाम्या पोटी खाल्याने फायदा होतो. (टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)