चिंचपोकळीच्या चिंतामणीची पहिली झलक, आगमन सोहळ्याला प्रचंड गर्दी

Published by: abp majha web team
Image Source: ABP Majha

गणेशोत्सव अगदी जवळ आलाय आणि मुंबईत बाप्पाच्या आगमनाची जोरदार तयारी सुरू झाली आहे.

Image Source: ABP Majha

शनिवारी परळ वर्कशॉपमधून चिंचपोकळीचा चिंतामणी मूर्तीचं आगमन झालं.

Image Source: ABP Majha

सुरुवातीच्या काळात ही मूर्ती लहान होती , सुमारे 2 ते 3 फुटांची होती आणि बायकुळा ते शिवडी परिसरात ओळखली जायची.

Image Source: ABP Majha

दरवर्षी ही मूर्ती चिंचपोकळी फ्लायओव्हरखाली विराजमान होते आणि हजारो भक्त दर्शनासाठी येतात.

Image Source: ABP Majha

यंदा चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाचं 106वं वर्ष आहे. हे मंडळ 1920 साली सुरू झालं.

Image Source: ABP Majha

या मंडळाला ‘आगमनाधीश बाप्पा’ म्हणून विशेष मान मिळालेला आहे.

Image Source: ABP Majha

यंदा 22 फुट उंच मूर्तीचं दर्शन घेण्यासाठी मुंबईच्या रस्त्यांवर हजारोंच्या संख्येने भक्तांची गर्दी झाली आहे.

Image Source: ABP Majha