सफरचंद खाल्ल्यानं आजार होतात?

Published by: श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई
Image Source: pexels

सफरचंदाचे अनेक आरोग्यासाठी फायदे आहेत.

Image Source: pexels

सफरचंदामध्ये फाइबर, विटामिन आणि अँटिऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात आहेत.

Image Source: pexels

सफरचंदामधील पोषक तत्व हृदयाचं आरोग्य राखण्यासाठी, वजन नियंत्रणासाठी, मधुमेहाच्या प्रतिबंधासाठी आणि पचनक्रिया सुधारण्यासाठी मदत करतं.

Image Source: pexels

अनेक लोकांना असं वाटतं की, सफरचंद खाल्ल्यानंही आजार उद्भवू शकतात.

Image Source: pexels

जाणून घेऊयात की, सफरचंद खाल्ल्यानं खरंच आजार होऊ शकतात का?

Image Source: pexels

सफरचंद खाल्ल्यानं काहीवेळा काही लोकांना त्रास होऊ शकतो.

Image Source: pexels

सफरचंदाचं सेवन अधिक प्रमाणात केल्यानं नुकसान होऊ शकतं. जास्त प्रमाणात आणि संध्याकाळच्या वेळेस सफरचंद खाल्ल्यास पचनाच्या समस्या उद्भवू शकतात.

Image Source: pexels

याव्यतिरिक्त, सफरचंदात आम्लाचं प्रमाण जास्त असतं, जे जास्त वेळ दातांच्या संपर्कात राहिल्यास टूथ इनेमलला नुकसान पोहोचवू शकतं.

Image Source: pexels

काही लोकांना सफरचंद खाल्ल्यानं एलर्जीची समस्या उद्भवू शकते. यामुळे श्वास घेण्यास त्रास, सूज आणि खाज येऊ शकते.

Image Source: pexels

टिप : वरील सर्व बाबी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.