चेहऱ्याची चमक वाढवण्यासाठी लोक भरपूर महागड्या ब्युटी ट्रीटमेंट घेत असतात.
परंतु याचा फायदा फक्त त्वचेच्या वरच्या थरावर होतो.
जर तुम्हाला त्वचा आतून निरोगी बनवायची असेल तर त्यासाठी तुम्ही तुमच्या दैनंदिन दिनचर्येत काही योगासने करू शकता.
नियमितपणे सर्वांगासन केल्यास चेहर्याची चमक वाढते. हे आसन करताना तुमच्या चेहऱ्याकडे रक्ताभिसरण होते आणि शरीरालासुद्धा याचा फायदा होतो.
हलासन केल्याने चेहऱ्याची त्वचा निरोगी होते आणि अकाली सुरकुत्या येण्याची शक्यता कमी होते आणि बद्धकोष्ठता आणि पोटाच्या समस्या कमी करण्यास मदत होते.
उस्त्रासन केल्याने रक्ताभिसरण सुधारते आणि त्वचेला ऑक्सिजन मिळतो. त्यामुळे त्वचा अधिक चमकदार दिसते.
हे आसन केल्याने चेहऱ्यावरील ताण कमी होतो आणि थकवा दूर होतो.
फेस योगा चेहऱ्यावरील सूज कमी करते, रक्ताभिसरण वाढवते, डार्क सर्कल कमी करते.
पफ योगा पोज, फिश पोज, चिन लिफ्ट, फेस टॅपिंग, बलून पोज, आयब्रो लिफ्टर, या काही फेस योगा केल्याने चेहऱ्याची त्वचा घट्ट होते आणि चेहऱ्यावरील ग्लो वाढतो.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)