हिंग हा स्वयंपाकात चव वाढवण्यासाठी वापरला जाणारा मसाला असला तरी त्याचे औषधी गुणधर्म अतिशय प्रभावी मानले जातात.

Published by: अदिती पोटे, एबीपी माझा
Image Source: Pexels

विशेषतः सकाळी रिकाम्या पोटी हिंगाचे पाणी पिल्यास अनेक आरोग्यदायी फायदे मिळू शकतात.

Image Source: Pexels

हिंगामध्ये पचनक्रिया सुरळीत ठेवण्याचे गुणधर्म आहेत. अपचन, वायू त्रास आणि अजीर्ण कमी होण्यास मदत होते.

Image Source: Pexels

पोटातील फुगणे व गॅसेस कमी करून आराम मिळतो.

Image Source: Pexels

शरीरातील रक्ताभिसरण चांगले राहते आणि हृदयाच्या आरोग्यासही फायदा होतो.

Image Source: Pexels

मेटाबॉलिझम वाढवून चरबी कमी करण्यास मदत करते

Image Source: Pexels

हिंगामध्ये अँटी-बॅक्टेरियल व अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म असल्याने इन्फेक्शनपासून संरक्षण मिळते.

Image Source: Pexels

पोटदुखी, क्रॅम्प्स यापासून सुटका मिळविण्यासाठी हिंग उपयुक्त ठरतो.

Image Source: Pexels

दम्यासारख्या त्रासात श्वसनमार्ग मोकळे होण्यास मदत होते.

Image Source: Pexels

मात्र हिंगाचे पाणी नेहमी मर्यादित प्रमाणातच घ्यावे. जास्त प्रमाण हानिकारक ठरू शकते.

Image Source: Pexels