लग्न हा सनातन धर्मातील चार महत्त्वाच्या संस्कारांपैकी एक आहे. हिंदू लग्नात अनेक प्रथा आणि विधी आहेत. काही विधी लग्नाआधी, काही लग्नादरम्यान तर काही लग्नानंतर केल्या जातात. या अनेक विधींपैकी एक म्हणजे वधूचा गृहप्रवेश. नववधू जेव्हा पहिल्यांदा सासरच्या घरी येते तेव्हा घरात प्रवेश करताना तांदळाने भरलेल माप ओलांडते. हिंदू धर्मात तांदळाला मोठे महत्त्व आहे. तांदूळ हे स्थिरतेचे प्रतीक मानले जाते. लक्ष्मीच्या पावलांनी वधू घरी येते. घरात सुख,समृद्धी आणि संपत्ती नांदावी यासाठी हा विधी केला जातो. जेव्हा वधू आपल्या पायाने माप ओलांडते आणि तांदूळ सर्वत्र पसरतो तेव्हा असे मानले जाते की घरामध्ये आनंद आणि समृद्धी देखील पसरते. वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.