सरडा कुठेही गेला तरी तो त्याच रंगाशी जुळवून घेतो. ज्यामुळे तो त्या वातावरणाशी जुळवून घेतो , आणि स्वतःला लपतो, आणि कोणाला सापडत नाही. त्याच्या त्वचेवर विशेष प्रकारच्या पेशींचा थर असल्यामुळे तो हे करू शकतो. तो थर रंगद्रव्याने भरलेला असतो. शास्त्रज्ञांच्या मते, जेव्हा सरड्याच्या शरीरातील तापमान वाढते किंवा कमी होते, तेव्हा या पेशींचा विस्तार किंवा आकुंचन सुरू होते. त्यामुळे सरड्याच्या रंग बदलतो,शास्त्रज्ञांच्या मते, सरड्याच्या रंगही त्याच्या मूडनुसार बदलतो. सरड्याच्या रंग बदलण्याचे कारण केवळ लपविणे नाही तर रंग बदलून ते त्यांच्या सोबतच्या सरड्यांना त्यांच्याच भाषेत संदेशही पाठवतात.