नृत्यांगना गौतमी पाटील नेहमीच या ना त्या कारणाने चर्चेत असते आपल्या नृत्याने तिने सर्वांना वेड लावलं आहे आधी कोल्हापूरात नंतर सिंधूदूर्ग आणि आता सोलपूरात नो एन्ट्री सोलापुरात नृत्यांगना गौतमी पाटीलच्या कार्यक्रमासाठी पोलिसांनी परवानगी नाकारली कायदा आणि सुव्यवस्थेचे कारण सांगत विजापूर नाका पोलिसांनी ही परवानगी नाकारली आहे सोलापुरातील एका स्थानिक डिजिटल वृत्तवाहिनीच्यावतीने डिस्को दांडियाआयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून गौतमी पाटील येणार होती मात्र, नवरात्रमुळे गौतमीच्या कार्यक्रमात पोलीस बंदोबस्त देणं शक्य नसल्याने परवानगी देण्यात आली नसल्याचे बोलले जात आहे त्यामुळे कार्यक्रमाची परवानगी नाकारत असल्याचे पोलिसांनी आयोजकाना पत्र दिले आहे गणेशोत्सवच्या काळात देखील गौतमी पाटीलच्या कार्यक्रमास राज्यात काही ठिकाणी परवानगी नाकारण्यात आली होती