हिवाळ्यात अंगदुखीचा त्रास का वाढतो?

Published by: श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई
Image Source: paxels

थंडीत अनेकदा आपल्याला आळस येतो, सकाळी उठल्यावर अंग आकडल्यासारखं वाटतं, दुखू लागतं.

Image Source: paxels

कधी ना कधी तुम्ही विचार केला असेल की, थंडीतच असा त्रास का होतो? चला तर मग जाणून घेऊया.

Image Source: paxels

थंडीत शरीराच्या नसा आकुंचन पावतात, तसेच रक्त आणि ऑक्सिजन व्यवस्थित शरीराच्या अवयवांपर्यंत पोहोचू शकत नाही.

Image Source: paxels

यामुळे सांध्यांमध्ये लवचिकता कमी होते आणि शरीराच्या स्नायूंमध्ये ताठरता आणि वेदना जाणवतात

Image Source: paxels

हिवाळ्यात सांध्यांमधील द्रव जाडसर होतो, ज्यामुळे सांधे आखडतात आणि वेदना वाढतात.

Image Source: paxels

थंडीत हवेचा दाब कमी होतो, ज्यामुळे सांध्याभोवतीचे स्नायू सुजतात, हे नसांवर दाब टाकते आणि वेदना होतात.

Image Source: paxels

थंडीत धावपळ कमी होते आणि विटामिन डी च्या कमतरतेमुळेही अंगदुखी वाढते

Image Source: paxels

रोजच्या धावपळीत वाढ झाल्यामुळे, तसेच सकाळी कोवळं ऊन घेणे, अंडे, मशरूम, पालक आणि मोहरीचे सेवन केल्याने या समस्येपासून बचाव करता येतो.

हिवाळ्यात थंड पाण्याने अंघोळ करणे टाळा आणि शक्य असल्यास कोमट पाण्याने अंघोळ करण्याचा प्रयत्न करा.

Image Source: paxels