सोलापुरच्या माळशिरसमधल्या नातेपुतेमध्ये गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. कार्यक्रमादरम्यान गौतमीचा डान्स पाहण्यासाठी युवकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. गौतमी पाटील गेल्या काही दिवसांपासून वादग्रस्त मुद्द्यांमुळे चर्चेत आहे. गौतमीच्या डान्सवर महाराष्ट्रातून टीका केली जात आहे. गौतमीच्या डान्समध्ये अश्लीलता असल्याची टीका करत तिने डान्स करणं बंद करावं अशी मागणी काही मंडळींनी केली आहे. आता सोलापुरात गौतमी पाटीलच्या नृत्याचा तडका पाहायला मिळाला आहे. सोलापुरात गौतमीचा डान्स पाहण्यासाठी तरुणांपासून वयोवृद्धांनी गर्दी केली होती. सोलापुरात गौतमीला पाहण्यासाठी तुफान गर्दी आणि चाहत्यांचा गोंधळ पाहायला मिळाला. आपला डान्स आणि एक्स्प्रेशन्सने गौतमीने तरुणाईला वेड लावलं आहे. सार्वजनिक कार्यक्रमात डान्स करताना गौतमीने आक्षेपार्ह डान्स स्टेप्स केल्या, ज्यामुळे गौतमीला माफी मागावी लागली होती.