कोलावेरी स्टार धनुषचे साऊथपासून बॉलिवूड आणि हॉलिवूडपर्यंत चाहते आहेत. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध कलाकार धनुषचा आज 39 वा वाढदिवस आहे. धनुषचा जन्म 28 जुलै 1983 रोजी झाला. त्याचे वडील कस्तुरी राजा हे प्रसिद्ध दिग्दर्शक आहेत. 'थुलुवधो इलमई' या कस्तुरी राजा यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटामधून धनुषनं अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. धनुषचं खरं नाव व्यंकटेश प्रभू कस्तुरी राजा असं आहे. करिअरच्या सुरुवातीला धनुषला त्याच्या लूकमुळे अनेकांनी ट्रोल केलं होतं. आज धनुषनं हॉलिवूड, बॉलिवूड अन् साऊथ चित्रपटसृष्टीमध्ये विशेष ओळख निर्माण केली आहे. धनुषनं द ग्रे मॅन या रुसो ब्रदर्सच्या चित्रपटातून हॉलिवूडमध्ये एन्ट्री केली आहे. द ग्रे मॅन हा चित्रपट 22 जुलै रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला.