अभिनेत्री करिश्मा तन्ना तिच्या अभिनय कारकिर्दीतून ब्रेक घेतल्यानंतर तिच्या वैवाहिक जीवनाचा पुरेपूर आनंद घेत आहे. ती सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांशी सतत जोडलेली असते. जवळपास दररोज ती तिच्या ग्लॅमरस लूकचे फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते. आता पुन्हा करिश्माच्या नव्या लूकने चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवले आहेत. नुकतीच तिने इंस्टाग्रामवर तिच्या लेटेस्ट लूकची झलक दाखवली. या फोटोंमध्ये अभिनेत्रीने खूप डीप नेक आणि निळ्या रंगाचा शॉर्ट ड्रेस घातलेला दिसत आहे. यासोबत तिने टोपी आणि सनग्लासेस घातले आहे. करिश्मा येथे बोटीवर बसून पोज देत आहे. दूरवर फक्त समुद्र दिसतो.