बॉलिवूडमधील ग्लॅमरस अभिनेत्री अशी ओळख असणाऱ्या दिशा पाटनीचा आज 30 वा वाढदिवस आहे.
दिशाचा जन्म 13 जून 1992 रोजी उत्तर प्रदेशमधील बरेली येथे झाला. दिशानं तिच्या स्टाईल आणि अभिनयानं बॉलिवूडमध्ये विशेष ओळख निर्माण केली.
दिशानं सलमान खान आणि टायगर श्रॉफ यांसारख्या प्रसिद्ध अभिनेत्यांसोबत काम केलं आहे.
पण दिशाला अभिनेत्री नाही तर शास्त्रज्ञ व्हायचं होतं. तिनं लखनौच्या एमिटी युनिव्हर्सिटीमधून बायोटेकमध्ये ग्रॅज्युएशन केले.
दिशानं कॉलेजमध्ये असताना मॉडलिंग करण्यास सुरुवात केली. मॉडलिंग करताना तिनं काही जाहिरातींमध्ये देखील काम केले.
तिनं वयाच्या 17 व्या वर्षी तिचं पहिलं फोटोशूट केलं. 2015 मध्ये कॅडबरी चॉकलेटची एक जाहिरात दिशानं केली.
त्यानंतर ‘लोफर’ या तेलगु चित्रपटांमधून दिशानं अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. या चित्रपटाचं दिग्दर्शन पुरी जगन्नाथ यांनी केलं आहे. ‘एमएस धोनीः द अनटोल्ड स्टोरी’या चित्रपटामधून दिशा पाटनीनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.
‘बागी 2’, ‘मलंग’, ‘भारत’,‘राधे’ या हिट चित्रपटांमधून दिशा प्रेक्षकांच्या भेटीस आली. अनेक वेळा दिशाचे नाव अभिनेता टायगर श्रॉफसोबत जोडण्यात आले.
पण दिशा आणि टागरनं त्यांच्या नात्याबाबत अजून कोणतीही माहिती चाहत्यांना दिलेली नाही. पार्थ समथान आणि दिशाच्या नात्याबाबत देखील सोशल मीडियावर चर्चा होत असते.
दिशाचे वडील जगदीश सिंह पटनी हे पोलीस अधिकारी आहेत आणि तिची आई आरोग्य निरीक्षक आहे. दिशाला खुशबू पटनी नावाची मोठी बहीण आहे तर सूर्यांश नावाचा एक छोटा भाऊ देखील आहे.