Digital Gold मध्ये गुंतवणूक करण्याकडे लोकांचा कल वाढत आहे. गुंतवणुकीसाठी प्रत्यक्ष सोने खरेदी करणे हे जोखीमपूर्ण देखील असते. हे सोने सुरक्षित ठिकाणी ठेवण्याची भीती सतावत असते. सध्या गुंतवणूकीसाठी Digital Gold Investment चा सुरक्षित पर्याय समोर आला आहे. यामध्ये Sovereign Gold Bond आणि गोल्ड ईटीएफ (Gold Exchange Traded Fund) हे गुंतवणुकीचे मुख्य प्रकार आहेत. डिजिटल गोल्ड हा ऑनलाइन सोने खरेदी करण्याचा एक मार्ग आहे. यामध्ये सोने तुमच्या डिजिटल वॉलेटमध्ये ठेवले जाईल. आपण ते खरेदी आणि विक्री देखील करू शकता. आवश्यकता असल्यास, तुम्ही काही अतिरिक्त शुल्क भरून डिजिटल सोन्याचे भौतिक सोन्यात रूपांतर करू शकता. गुंतवणूक करण्याचा नवीन पर्याय म्हणून ग्राहकांना 2015 पासून सार्वभौम गोल्ड बाँडचा (Sovereign Gold Bond) पर्याय उपलब्ध झाला आहे. Sovereign Gold Bond हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून जारी केले जाते. यामध्ये किमान एक ग्रॅम सोने खरेदी करता येते. एका आर्थिक वर्षात एखादी व्यक्ती अधिकाधिक 4 किलो सोने खरेदी करू शकते. Sovereign Gold Bond वर दरसाल 2.5 टक्के व्याज मिळते. गोल्ड ईटीएफ शेअर्सप्रमाणे विकत घेतले जाऊ शकतात आणि डिमॅट खात्यात ठेवता येतात. जेव्हा तुम्ही गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवणूक करता, तेव्हा तुमच्याकडे प्रत्यक्ष सोने नसते. परंतु तुमच्याकडे सोन्याच्या किमतीएवढे मूल्य असते.