'बधाई दो' या चित्रपटात चुम दरांग हिने भूमी पेडणेकरच्या ‘गर्लफ्रेंड’ भूमिका साकारली आहे.
अभिनेत्री चुम दरांग ही मुळची अरुणाचल प्रदेशातील पासीघाट येथील आहेत. तिचा जन्म 16 ऑक्टोबर 1991 रोजी झाला. चुम एक मॉडेल, अभिनेत्री आणि बिझनेसवुमन देखील आहे. एवढेच नाही, तर चुमने सौंदर्य स्पर्धाही जिंकल्या आहेत.
चुम ही सामाजिक कार्यकर्ती देखील असून, पासीघाटमध्ये ती स्वतःचा कॅफे देखील चालवते. तिचा कॉफी कॅफे खूप प्रसिद्ध आहे.
चुम अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सौंदर्य स्पर्धांचा भाग बनली आहे. तिने 2010 मध्ये ‘Miss AAPSU’चा किताब जिंकला होता.
चुमने यापूर्वीही अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींसोबत काम केले आहे. तिने अक्षय कुमार आणि रणवीर सिंगसोबत अनेक जाहिरातींमध्ये काम केले आहे.
‘बधाई दो’पूर्वी तिने 'पाताल लोक' या वेब सिरीजमध्येही काम केले आहे. या सिरीजमध्ये तिची छोटीशी भूमिका होती. यानंतर तिने 'बधाई दो'साठी ऑडिशन दिले आणि तिची निवड झाली. (All PC : @chum_darang/IG)