बॉलिवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीचा 'बाहुबली' अशी ओळख असणारा अभिनेता प्रभासचा (Prabhas) आज वाढदिवस आहे. प्रभासचं पूर्ण नाव प्रभास राजु उप्पालापाटी असं आहे. त्याचा जन्म 23 ऑक्टोबर 1979 रोजी चेन्नई येथे झाला. प्रभास अजूनही अविवाहित असून त्याचं नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं जातं. प्रभासला अभिनय नाही तर हॉटेल बिझनेस करायचा होता. हैदराबादच्या श्री चैतन्य कॉलेजमधून त्यांनं बी. टेकचे शिक्षण घेतले आहे. प्रभासने 'ईश्वर' या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. 'राघवेंद्र', 'वर्षम', 'योगी', 'एक निरंजन', 'रेबेल', 'बाहुबली', राधे श्याम यांसारख्या चित्रपटात त्यानं काम केलं. आता लवकरच त्याचा आदिपुरुष हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. बाहुबली चित्रपट हिट झाल्यावर प्रभासची लोकप्रियता वाढली. एका वृत्तानुसार, बाहुबलीनंतर प्रभासला जवळपास 6000 पेक्षा जास्त मुलींनी लग्नाची मागणी घातली होती. बाहुबलीनंतर प्रभासला चित्रपट निर्मात्यांनी एक कोटींचे जीम इक्विपमेंट्स गिफ्ट म्हणून दिले होते.