के एल राहुलने (KL Rahul catch) बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात सुपरमॅनसारखा कॅच झेलला. विकेटकीपिंग करणाऱ्या के एल राहुलने आपल्या डाव्या बाजूने झेप घेऊन अप्रतिम झेल घेतला मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर के एल राहुने हा झेल टिपत, बांगलादेशला तिसरा धक्का दिला. राहुलने घेतलेल्या या कॅचमुळे बांगलादेशचा मेहदी हसन अवघ्या 3 धावा करुन माघारी परतला के एल राहुलने घेतलेल्या या अप्रतिम झेलमुळे टीम इंडियाच्या खेळाडूंनी कौतुक केलं. दुसरीकडे के एल राहुलने घेतलेल्या कॅचचा व्हिडीओ सोशल मीडियावर क्षणार्धात व्हायरल झाला. सोशल मीडियावरही के एल राहुलच्या या व्हिडीओचं कौतुक होत आहे. भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात आज पुण्यातील गहुंजे स्टेडियमवर सामना होत आहे. भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील सामन्यात नाणेफेक जिंकून बांगलादेशने प्रथम फलंदाजी निवडली या सामन्यात बांगलादेश भारताला किती धावांचं आव्हान देणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.