दक्षिण भारतात किंक्रांतीचा दिवस 'मट्टू पोंगल' म्हणून साजरा करतात.
मकरसंक्रांतीचा सण सगळीकडे आनंदाने आणि उत्साहात साजरा झाला.
मात्र, खूप कमी लोकांना माहित आहे की, संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रांत साजरी केली जाते.
किंक्रांत म्हणजे काय याबाबत जाणून घेऊयात.
संक्रांतीदेवीने मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंकरासुरा नावाच्या राक्षसाला ठार मारले
आणि त्याच्या जाचातून प्रजेला मुक्त केले. म्हणून हा दिवस किंक्रांत म्हणून पाळला जातो.
पंचागात हा दिवस करिदिन म्हणून दाखवलेला असतो.
हा दिवस शुभकार्याला घेतला जात नाही.
या दिवशीही स्त्रिया हळदीकुंकू समारंभ साजरा करतात.
दक्षिण भारतात किंक्रांतीचा दिवस 'मट्टू पोंगल' म्हणून साजरा करतात