दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध कलाकार किच्चा सुदीप हा त्याच्या विक्रांत रोणा या चित्रपटामुळे चर्चेत आहे.



किच्चा सुदीपच्या या चित्रपटाचं प्रमोशन इव्हेंट काही दिवासांपूर्वी मुंबई येथे पार पडला. या इव्हेंटला अभिनेता सलमान खाननं हजेरी लावली होती.



मुंबईमधील वांद्रा येथील ताज लँड्स हॉटेलमध्ये हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात बोलताना किच्चा सुदीपनं बॉलिवूडची तुलना विराट कोहलीसोबत केली.



सुदीप कार्यक्रमामध्ये म्हणाला, 'वर्षभरात अनेक चित्रपटांची निर्मिती केली जाते. प्रत्येक चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करेल, असं होत नाही. '



'बॉलिवूडनं चांगलं काम केलं नसतं तर एवढी वर्ष ही इंडस्ट्री टिकली असती का? जसे विराट कोहली काही दिवस फॉर्ममध्ये नसला तरी त्याचे रेकॉर्ड कोणी त्याच्याकडून काढून घेऊ शकत नाही. तसंच बॉलिवूडचं देखील आहे', असंही तो म्हणाला.



किच्या सुदीपचा विक्रांत रोणा हा चित्रपट इंग्रजी, कन्नड, तामिळ, तेलगू, मल्याळम आणि हिंदी भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.



28 जुलै रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. अनूप भंडारी लिखित आणि दिग्दर्शित, 'विक्रांत रोणा' थ्रीडीमध्ये प्रदर्शित होणार आहे.



. विक्रांत रोणा चित्रपटाच्या ट्रेलरला अनेकांची पसंती मिळाली.



किच्चा सुदीपसोबतच अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसनं देखील या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे.



विक्रांत रोणा चित्रपटाची वाट प्रेक्षक उत्सुकतेने बघत आहेत.