अभिनेत्री संजना संघी हिने तिच्या पहिल्याच चित्रपटामधून जगभरात चांगलीच लोकप्रियता मिळवली होती. गेल्या काही काळापासून संजना तिच्या लूकमुळे खूप चर्चेत आहे. आजकाल तिचा सिझलिंग लूक पाहायला मिळत आहे. संजना सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे आणि तिच्या फोटोशूटची झलक चाहत्यांसोबत सतत शेअर करत असते. लेटेस्ट फोटोशूटमध्ये संजनाने डेनिम ब्लू शॉर्ट स्कर्ट परिधान केलेला दिसत आहे. यासोबत तिने ऑरेंज कलरचा स्टायलिश क्रॉप टॉप घातला आहे. अभिनेत्रीने लांब श्रग कॅरी करून तिचा लूक पूर्ण केला आहे. संजनाने या आऊटलूकसह न्यूड ग्लॉसी मेकअप केला आहे आणि अर्धे केस बांधले आहेत. येथे तिने कानात गोल्डन हूप इअरिंग्ज घातल्या आहेत. संजना तिचा लूक खूप स्वॅगमध्ये फ्लॉंट करताना दिसत आहे.