बॉलिवूड स्टार कियारा अडवाणी बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्रींपैकी एक. कियारा सध्या आपला आगामी चित्रपट 'भूल भुलैया 2'मुळे चर्चेत आहे. सध्या ती आगामी चित्रपट 'भूल भुलैया 2'चं प्रमोशन करतेय. या दरम्यानचे काही फोटो तिनं इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. कियाराचा हा क्लासी लूक पाहून चाहते घायाळ झाले आहेत. कियारानं सिल्वर कलरचा क्रॉप टॉप वेअर केला आहे, त्यासोबतच तिनं थाय हाय स्लिट स्कर्ट वेअर केलाय कियारा अडवाणीने या आउटफिटमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. फोटोंमध्ये कियारा वेगवेगळ्या पोज देताना दिसत आहे. कियाराच्या फोटोंवर चाहते खूप कमेंट करत आहेत. कियाराच्या फोटोवरून त्याची नजर हटत नाहीये. कियारा अडवाणी लवकरच 'भूल भुलैया 2'मध्ये दिसून येणार आहे. 20 मे रोजी हा चित्रपट रिलीज होणार आहे.