चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध निर्माते बोनी कपूर यांच्या धाकट्या मुलीने अभिनयाच्या दुनियेत पाऊल ठेवले आहे. लवकरच खुशीचा चित्रपट 'आर्चीज' OTT प्लॅटफॉर्म Netflix वर प्रदर्शित होणार आहे. कधी विमानतळावरून तर कधी इंस्टाग्रामवरून खुशीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात. ख़ुशीने अलीकडेच काही नवे फोटो शेअर केले आहेत. ज्यात तिने साडी परिधान केलेली दिसत आहे. या चिकनकारी पद्धतीच्या साडीमध्ये ख़ुशी फारच सुंदर दिसत आहे. अभिनेत्री जान्हवी कपूर आपल्या क्लासी अंदाजानं चाहत्यांना भूरळ पाडतेच. पण याबाबतीत जान्हवीची लहान बहिण खुशी कपूर भल्या भल्या अभिनेत्रींना मागे टाकते. खुशी लवकरच जोया अख्तर दिग्दर्शित 'आर्चीज'मधून बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार आहे.