नुकातच मुंबईकर चेतन राऊतच्या नेतृत्वात मालुर यश फॅन्स यांच्या मदतीने मोझॅकचा विश्वविक्रम करण्यात आला.



अभिनेता यशच्या वह्यांचा वापर करून आलेल्या मोझॅक पोट्रेटमध्ये 20,700 वह्यांचा वापर करण्यात आला.



लाल, पिवळा, निळा, हिरवा, काळा , पांढरा अश्या 6 रंगछटा असलेल्या या वह्यांचा पोट्रेलसाठी वापर करण्यात आला आहे.



पोट्रेटचा आकार 130 फूट लांब आणि 190 फूट रुंद आहे.



पोट्रेट कर्नाटकमधील मालुरच्या व्हाईट गार्डन मैदानात 25 650 वर्ग फूट मध्ये पसरला आहे.



पोट्रेट प्रदर्शन पूर्ण झाल्यावर ह्या मधील प्रत्येक वह्यांचे वाटप शासकीय शाळांमधील विद्यार्थ्यांना करण्यात येणार असल्याची माहिती चेतन राऊत यांनी दिली.



अवघ्या 2 दिवसात ही कलाकृती पूर्ण केली.



केजीएफ चॅप्टर-2 या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकचतेनं वाट पाहात आहेत.