देशातील कोरोनाचा संसर्ग दिवसागणिक वाढत आहे मागील 24 तासांत 21 हजारांहून अधिक नवीन कोरोना रुग्ण आढळले असून 60 जणांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे देशातील सक्रिय रुग्णांची संख्याही दिवसागणिक वाढत आहे सध्या देशात एक लाख लाख 49 हजार 482 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत दिवसेंदिवस वाढणारी रुग्णसंख्या पाहता आरोग्य प्रशासनासमोर मोठी चिंतेची बाब निर्माण झाली आहे देशात मागील 24 तासांत 21 हजार 219 रुग्ण कोरोना संसर्गातून बरे झाले आहेत देशात एकूण 4 कोटी 31 लाख 71 हजार 653 रुग्णांनी कोरोना संसर्गावर मात केली आहे देशात एकूण 5 लाख 25 हजार 930 रुग्णांनी कोरोना संसर्गामुळे प्राण गमावला आहे गुरुवारी महाराष्ट्रात 2289 कोरोनाच्या नव्या रुग्णांची भर पडली, तर गेल्या 24 तासांत एकूण 2400 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत महाराष्ट्रात नव्याने नोंद झालेल्या रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण हे पुणे जिल्ह्यातील आहे महाराष्ट्रात गुरुवारी सहा कोरोनाबाधित मृत्यूची नोंद झाली आहे महाराष्ट्रात आतापर्यंत 78 लाख 64 हजार 831 कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतले आहेत