बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री अनुष्का शर्मा नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. अभिनेत्री सध्या मोठ्या पडद्यापासून दूर असली, तरी इंटरनेटच्या माध्यमातून ती सतत तिच्या चाहत्यांशी कनेक्टेड असते. सध्या अनुष्का शर्मा पती क्रिकेटर विराट कोहली आणि मुलगी वामिकासोबत सुट्टीसाठी पॅरिसला गेली आहे. अभिनेत्रीने व्हेकेशनचे फोटो तिच्या सोशल मीडियावर शेअर केले आहे. अनुष्का शर्माने नुकतेच तिच्या इंस्टाग्रामवर तिचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये अनुष्का शर्मा पॅरिसमध्ये तिची सुट्टी खूप एन्जॉय करत आहे. या फोटोंमध्ये अनुष्का पांढऱ्या रंगाच्या बाथरोबमध्ये खिडकीजवळ बसलेली दिसत आहे. यासोबतच ती हातात कप घेऊन क्रोसेंट खाताना दिसत आहे. फोटो शेअर करत त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'पॅरिसमध्ये असताना भरपूर क्रोसेंट खा’. अनुष्का ज्या क्रोसेंट डिशचा उल्लेख करत आहे, ती एक फ्रेंच पेस्ट्री आहे, जी चहा आणि कॉफीसोबत खाल्ली जाते. या फोटोंशिवाय, तिने तिच्या इन्स्टा स्टोरीवर पॅरिसचे अनेक फोटो शेअर करून, तिच्या व्हेकेशनची झलकही चाहत्यांसोबत शेअर केली आहे.