दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीच्या सीमा ओलांडत अभिनेत्री किर्ती सुरेशने चाहत्यांच्या मनावर जादू केली आहे. अभिनेत्री किर्ती सुरेश दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. अभिनेत्री किर्ती सुरेशचा नवा स्टायलिश लूक समोर आला आहे. शिमरी ड्रेसमध्ये किर्तीच्या कातील अदांनी चाहते घायाळ झाले आहेत. स्मोकी मेकअप आणि मोकळे केस असा किर्तीचा हा लूक आहे. या लूकमध्ये किर्ती फारच सुंदर दिसत आहे. फोटोंमध्ये किर्ती वेगवेगळ्या पोज देताना दिसत आहे. किर्ती तिच्या स्टायलिश अंदाजामुळेही चर्चेत असते. वेस्टर्न, ट्रेडिशनल किंवा कॅज्यूअल असा प्रत्येक लूक किर्तीवर उठून दिसतो. किर्तीने लहान वयातच चित्रपटांमध्ये सुरुवातीला बाल कलाकार म्हणून काम करण्यास सुरुवात केली. किर्ती सुरेशने तिच्या अभिनयाच्या जोरावर स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे.