कतरिना कैफने लग्नानंतर पहिल्यांदाच केला स्वयंपाक

बॉलिवूडमधील सध्याचे चर्चित कपल असलेले कतरिना आणि विकी आता लग्नाच्या बेडीत अडकले आहेत.

लग्नानंतरच्या ज्या काही प्रथा असतात त्या आता केल्या जात आहेत.

त्याचाच एक भाग म्हणून कतरिनाने विकी कौशलसाठी शिरा बनवला.

कतरिनाने तिच्या सोशल मीडियावर हा फोटो शेअर करत 'मी बनवलं' असं कॅप्शन शेअर केलं आहे.

एकंदरीत आता कतरिना-विकीच्या संसाराला सुरुवात झाली आहे.

कतरिना आणि विकी कौशलचे लग्न 9 डिसेंबरला सवाई माधोपूर येथील सिक्स सेन्स फोर्टमध्ये पार पडले.

या शाही लग्नसोहळ्यात फक्त त्यांच्या जवळच्या लोकांनी हजेरी लावली होती.