गेल्या दोन दिवसांपासून ट्विटरवर फक्त करण कुंद्राचीच चर्चा होत आहे. कधी त्याच्या 'बारिश आ जाए' गाण्यामुळे तर कधी त्याच्या 'डान्स दिवाने ज्युनियर्स' या शोमुळे तो चर्चेत आहे. 'बिग बॉस 15' पासून त्याचं करिअर जोमात आहे. #WE WILL MISS YOU HOST KARAN हा हॅशटॅग सध्या ट्विटरवर ट्रेंड करत आहे करण कुंद्रा बऱ्याच दिवसांपासून 'डान्स दिवाने ज्युनियर्स' होस्ट करत आहे. त्याची प्रेमळ शैली प्रेक्षकांना खूप आवडते. नोरा फतेहीसोबतची त्याची फ्लर्टी स्टाइल असो किंवा नीतू कपूरसोबतची त्याची बाँडिंग असो, त्याच्या चर्चा सर्वत्र आहेत. काल करणने 'डान्स दिवाने ज्युनियर्स'चा शेवटचा एपिसोड शूट केला चाहत्यांना याची माहिती मिळताच ट्विटरवर '#WE WILL MISS YOU HOST KARAN 'चा महापूर आला.