पीव्हीआर-आयनॉक्स मल्टिप्लेक्स चेन ऑपरेटरला मार्च अखेरच्या तिमाहीत 333 कोटींचा तोटा झाल्यानंतर आता कंपनीने एक मोठा निर्णय घेतला आहे. कंपनीकडून पुढील सहा महिन्यात 50 सिनेमा स्क्रिन्स बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
यावर आता बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री कंगना रनौतनं (Kangana Ranaut) प्रतिक्रिया दिली आहे.
कंगनानं एका ट्वीटच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे.
ट्रेड एक्सपर्ट गिरीश जौहर यांनी एक ट्वीट शेअर केले आहे. या ट्वीटला कंगनानं रिप्लाय दिला आहे.
गिरीश जौहर यांनी ट्वीटमध्ये लिहिलं, 'अहवालानुसार, 2023 या वर्षाच्या पहिल्या तीन महिन्यांत PVR ला 333 कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. तर गेल्या वर्षी 170 कोटींचा तोटा झाला आहे. आता PVR पुढील 6 महिन्यांत 50 चित्रपटगृहे बंद करण्याचा विचार करत आहे.'

पुढे ट्वीटमध्य कंगनानं लिहिलं, 'मल्टिप्लेक्समध्ये चित्रपट पाहणे खूप महाग झाले आहे, मित्र/कुटुंबासोबत चित्रपट बघायला जाणे म्हणजे मध्यमवर्गीय व्यक्तीच्या पगारामधील मोठी रक्कम खर्च होण्यासारखं आहे. यासाठी काहीतरी करणे आवश्यक आहे.'