अभिनेत्री अदा शर्मा ही गेल्या काही दिवसांपासून द केरळ स्टोरी या चित्रपटामुळे चर्चेत आहे.



एका नेटकऱ्यानं ट्वीट शेअर करुन द केरळ स्टोरी या चित्रपटाला ट्रोल केलं आहे. त्या नेटकऱ्याच्या ट्वीटला अदा शर्मानं दिलेल्या रिप्लायनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.



एका नेटकऱ्यानं ट्वीट शेअर करुन द केरळ स्टोरी या चित्रपटाला ट्रोल केलं आहे. त्यानं ट्वीटमध्ये लिहिलं, 'प्रपोगंडा चित्रपट बनवून पैसे कमवू शकता, पण आदर कमवू शकत नाही.'



नेटकऱ्याच्या ट्वीटला अदानं दिलेल्या रिप्लायनं अनेकांचे लक्ष वेधले.



अदानं ट्वीटमध्ये लिहिलं, 'मी तुमच्याशी पूर्णपणे सहमत आहे. फक्त भारतामधूनच नाही तर जगभरातून मला आदर दिल्याबद्दल धन्यवाद!'



द केरळ स्टोरी या चित्रपटातील अदाच्या अभिनयाचं अनेक जण कौतुक करत आहेत.



अदानं या चित्रपटात शालिनी ही भूमिका साकरली आहे.



शालिनी ही फातिमा कशी होते? हे द केरळ स्टोरी या चित्रपटात दाखवण्यात आलं आहे.



2008 मध्‍ये रिलीज झालेल्या विक्रम भट्टच्‍या 1920 या हॉरर चित्रपटामधून अदानं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.



अदानं कमांडो 2, कमांडो 3 आणि बायपास रोडसह अनेक चित्रपटांमध्ये काम केले.