बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री कंगना रनौत ही 'कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन' म्हणून ओळखली जाते.
कंगना वेगवेगळ्या विषयांवर तिची मतं मांडते.
कंगना लग्न कधी करणार? असा प्रश्न आता चाहत्यांना पडला आहे.
कंगनानं आता तिच्या लग्नाबाबत एका मुलाखतीमध्ये सांगितलं आहे.
कंगनानं एका मुलाखतीमध्ये सांगितलं, 'माझं लग्न होत नाहीये कारण लोक माझ्याबद्दल अफवा पसरवत आहेत. लोक म्हणतात की मी खूप भांडते. लोकांमध्ये अशी चर्चा आहे की, मी मुलांना मारते. '
मुलाखतीमध्ये कंगनाला प्रश्न विचारण्यात आला की, 'तुझ्या धाकड चित्रपटाच्या कॅरेक्टरसारखीच तु रिअल लाइफमध्ये देखील धाकड आहेस का?'
कंगना म्हणाली , 'असं नाहीये. मी रिअल लाइफमध्ये कोणाला मारणार? माझं लग्न होतं नाहीये कारण लोकांनी काही अफवा पसरवल्या आहेत.
कंगनाचा धाकड हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
कंगनाचा 'धाकड' सिनेमा हिंदीसह तामिळ, तेलुगू आणि मल्याळम भाषेत प्रदर्शित होणार आहे.
सिनेमात कंगना एका डिटेक्टिव्हची भूमिका साकारणार आहे