बॉलिवूडची पंगाक्वीन कंगना रनौत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

अग्निपथ योजनेबाबत देशभरात संताप व्यक्त होत आहे.

एकीकडे देशाच्या विविध भागात आंदोलक आपला निषेध व्यक्त करत आहेत.

पण कंगनाने मात्र या योजनेचे समर्थन केलं आहे.

कंगनाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत लिहिले आहे, इस्रायल सारख्या देशांनी तरुणांना सैन्य दलात भरती करणे बंधनकारक केलं आहे.

त्यामुळे देशातील प्रत्येक नागरिक आयुष्यातील काही वेळ देशसेवेत घालवतो.

अग्निपथ योजना ही खूप महत्त्वाची योजना आहे.

ड्रग्ज आणि पबजी खेळणाऱ्या मंडळींना योग्य दृष्टी देण्यासाठी अग्निपथ योजना महत्त्वाची ठरणार आहे.

'अग्निपथ योजने'ला सध्या देशभरातून विरोध होत आहे.

पण अभिनेत्री कंगना रनौतने मात्र या योजनेचे समर्थन केलं आहे.