लॉकअप शोचे सूत्रसंचालन अभिनेत्री कंगना रनौत करते.



एका एपिसोडमध्ये कंगनानं एक गौप्यस्फोट केला आहे.



कार्यक्रमात मुनव्वर फारूकीनं(Munawar Faruqui) एका टास्क दरम्यान बालपणी त्याच्यासोबत झालेल्या लैंगिक शोषणाबाबत सांगितलं.



मुनव्वरनं सांगितलेल्या घटनेनंतर कंगनानं देखील तिच्यासोबत घडलेल्या घटनेबाबत सांगितलं.



मुनव्वर फारूकीनं सांगितलं की, जेव्हा त्याच्या एका नातेवाईकानं त्याच्यावर लैंगिक शोषण केले तेव्हा तो केवळ सहा वर्षाचा होता.



मुनव्वरनं ही घटना सांगितल्यानंतर कंगना म्हणाली, 'अनेक लहान मुलांचे लैंगिक शोषण केले जाते. पण ती मुलं ही गोष्ट सांगू शकत नाहित.'



'माझं देखील बालपणी लैंगिक शोषण केलं होतं. आमच्या शहरामधील एक मुलगा मला स्पर्श करत होता. तेव्हा मी खूप लहान होते.', असंही कंगना म्हणाली.



‘लॉकअप’ शोमध्ये सर्व स्पर्धकांवर 24x7 लक्ष ठेवले जाते.