बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत तिच्या रिअॅलिटी शो 'लॉक अप'मुळे सतत चर्चेत आहे.

कंगनाच्या शो संबंधी रोज काही ना काही व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.

कंगना राणौतने लाल रंगाचा ड्रेस परिधान केलेली एक पोस्ट शेअर केली आहे. तिची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

कंगना राणौतने 'गँगस्टर' या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली होती.

हा चित्रपट 28 एप्रिल 2006 रोजी प्रदर्शित झाला होता. चित्रपट प्रदर्शित होऊन आज 16 वर्षे झाली आहेत.

या चित्रपटाला तिच्या बॉलिवूड प्रवासाशी जोडत कंगना राणौतने एक पोस्ट केली आहे.

काही फोटो शेअर करत कंगना रणौतने इंस्टाग्रामच्या अधिकृत अकाऊंटवर एक लांबलचक कॅप्शन लिहिले आहे.

'गँगस्टर 16 वर्षांपूर्वी आजच्या दिवशी म्हणजे 28 एप्रिल 2006 रोजी रिलीज झाला आणि मी अभिनेत्री म्हणून माझा प्रवास सुरू केला.' असे कंगनाने लिहिले आहे.

'आज, 28 एप्रिल 2022 रोजी, प्राइम व्हिडीओचा पाचवा वर्धापन दिन साजरा करताना, मी मणिकर्णिका फिल्म्सची पहिली निर्मिती 'टिकू वेड्स शेरू' लाँच केली, असे कंगनाने लिहिले आहे.

याच दिवशी मी निर्माता म्हणून माझा प्रवास सुरू करत आहे.

प्राइम व्हिडिओचे खूप खूप आभार, असे कंगनाने आपल्या पोस्टमध्ये मटले आहे.