बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री कंगना रनौत सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. वेगवेगळ्या विषयांवरील मतं कंगना सोशल मीडियावर मांडत असते. नुकतीच कंगनानं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. पोस्टमध्ये तिनं अभिनेता यशचं कौतुक केलं आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून कंगना म्हणाली की यश हा 'अँग्री यंग मॅन' आहे. 'भारत गेली काही दशके अँग्री यंग मॅनला मिस करत होता.', असंही कंगना पोस्टमध्ये म्हणाली. पोस्टमध्ये कंगनानं यशची तुलना अमिताभ बच्चन यांच्यासोबत केली. अभिनेता यशचा 'केजीएफ चॅप्टर 2' हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे.