आजकाल लोकांमध्ये शाकाहारी राहण्याची क्रेझ वाढली आहे. बॉलिवूडमधील काही कलाकार असे आहेत, जे शाकाहारी आहेत. जाणून घेऊया त्या स्टार्सबद्दल...



अमिताभ बच्चन हे शाकाहारी आहेत. त्यांनी कौन बनेगा करोडपती 14 मध्ये सांगितले की, त्यांनी मांसाहार आणि गोड पदार्थ खाणे सोडले आहे.



दम लगा के हैशा चित्रपटानंतर झपाट्याने वजन कमी करणारी भूमी पेडणेकर ही 2020 मध्ये लॉकडाऊन शाकाहारी बनली.



भूमी ही तिच्या फिटनेसकडे विशेष लक्ष देते.



रितेश देशमुख 2019 मध्ये शाकाहारी झाला. त्याची आणि जिनिलिया देशमुखची एक प्लान्ट बेस्ड मीट्स कंपनी आहे.



सोनम कपूर आहुजाचा शाकाहारी कलाकारांच्या यादीत समावेश होतो.



सोनमला दोनदा PETA पर्सन ऑफ द इयर म्हणून निवडण्यात आले आहे.



वयाची 49 व्या वर्षी मलायका अरोरा तिच्या फिटनेसकडे विशेष लक्ष देते. मलायका दोन-तीन वर्षांपूर्वी शाकाहारी बनली होती.



आर माधवन सुरुवातीपासूनच शाकाहारी आहे. बॉलिवूड आणि साऊथ चित्रपटसृष्टीमध्ये आर. माधवननं विशेष ओळख निर्माण केली आहे.



आर. माधवनचा चाहता वर्ग मोठा आहे. त्याच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघतात.