गेल्या काही दिवसांपूर्वी जॉन प्रभाससोबत 'सालार' या तेलगू चित्रपटात दिसणार असल्याच्या बातम्या आल्या होत्या.

या बातम्यांवर आता जॉनने मोठे वक्तव्य केले आहे.

बॉलिवूडचे चित्रपट साऊथमध्ये जास्त चालत नसल्यावरून अभिनेता सलमानने आश्चर्य व्यक्त केले होते. परंतु, या बाबतीत जॉनची विचारसरणी इतरांपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे.

एका मुलाखतीदरम्यान तो त्याच्या आगामी चित्रपटाप्रमाणे अटॅक मुडमध्ये दिसला.

जॉन म्हणाला, 'मी कधीच प्रादेशिक सिनेमा करणार नाही. मी हिंदी चित्रपटाचा हिरो आहे.

फक्त चित्रपटाचा भाग होण्यासाठी मी काही सेकंड लीडची भूमिका करणार नाही.

फक्त व्यवसायात टिकून राहण्यासाठी मी इतर कलाकारांप्रमाणे प्रादेशिक चित्रपटांचा भाग बनणार नाही.

अलिकडच्या काळात अनेक बॉलिवूड स्टार्स साऊथ सिनेमांमध्ये दिसत आहेत.