सध्या जागतिक मंदीच्या सावटामुळे नोकरकपातीचं संकट घोंघावत आहे. अनेक दिग्गज कंपन्यांकडून कर्मचाऱ्यांना नारळ दिला जात आहे.



असं असताना काही दिग्गज कंपन्यांकडून नोकरभरती केली जात आहे.

असं असताना काही दिग्गज कंपन्यांकडून नोकरभरती केली जात आहे.

विशेषत: फ्रेशर्ससाठी ही भरती केली जात आहे, ज्यांचं नुकतंच शिक्षण पूर्ण झालं आहे.

विशेषत: फ्रेशर्ससाठी ही भरती केली जात आहे, ज्यांचं नुकतंच शिक्षण पूर्ण झालं आहे.

ऐन नोकरकपातीच्या काळाता काही कंपन्यांकडून नोकरभरती केली जात आहे. यामध्ये आयटी सेक्टर आघाडीवर आहे.

ऐन नोकरकपातीच्या काळाता काही कंपन्यांकडून नोकरभरती केली जात आहे. यामध्ये आयटी सेक्टर आघाडीवर आहे.

दिग्गज आयटी कंपनी इन्फोसिसमध्ये 4263 रिक्त जागांवर भरती करण्यात येणार आहे. नेटवर्किंग साइट लिंक्डइननेयाबाबत माहिती दिली आहे.



यामध्ये इंजिनियर, सॉफ्टवेअर, हार्डवेअर आणि QA श्रेणी, सल्लागार, प्रोजेक्ट मॅनेजमेंट अशा विविध पदांवर भरती करण्यात येणार आहे.



एअर इंडिया आपला विस्तार वाढवण्याची योजना आखत आहे. कंपनी अधिक कर्मचारी आणि वैमानिक नियुक्त करणार आहे.



त्यामुळे एअर इंडिया यावर्षी 900 हून अधिक नवीन पायलट आणि 4,000 हून अधिक केबिन क्रू मेंबर्सची नियुक्ती करण्याची शक्यता आहे.



टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे (TCS) कडून सुमारे 1000 कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येईल.



टीसीएसचे मानव संसाधन प्रमुख मिलिंद लक्कड यांनी एका पत्रकार परिषदेदरम्यान ही माहिती दिली आहे.



विप्रो कंपनीकडे भारतात 3292 कर्मचाऱ्यांची भरती करणार आहे. लिंक्डइन वेबसाइटने ही माहिती दिली आहे.



कंटेंट रिव्यूअस ते मार्केट लीड यासारख्या वैविध्यपूर्ण पदांवर भरती करण्यात येईल.



याशिवाय ग्राहक सेवा, ऑपरेशन्स, इंजिनियरींग, आयटी आणि माहिती सुरक्षा, अकाऊंट अँड फायनान्स विभागांमध्येही भरती करण्यात येईल.