रॉयल एनफील्डची सर्वात स्वस्त बाईक किती मायलेज देते?

Published by: मुकेश चव्हाण

रॉयल एनफील्डची सर्वात स्वस्त बाईक कोणती, असा प्रश्न विचारल्यास, हंटर 350 हे त्याचे उत्तर आहे.

रॉयल एनफील्ड हंटर 350 एक शानदार आणि शक्तिशाली बाइक आहे.

तुम्हाला माहीत आहे का की रॉयल एनफील्ड हंटर 350 किती मायलेज देते?

रॉयल एनफील्ड हंटर 350 मध्ये सिंगल-सिलेंडर, 4-स्ट्रोक, एअर-ऑइल कूल्ड इंजिन आहे.

मोटारसायकलमध्ये बसवलेल्या या इंजिनमधून 4000 rpm वर 27 Nm चा टॉर्क तयार होतो.

रॉयल एनफील्डच्या या बाईकमध्ये इलेक्ट्रॉनिक फ्यूल इंजेक्शन प्रणाली देखील आहे.

हंटर 350 एक लीटर पेट्रोलमध्ये अंदाजे 36 किलोमीटर अंतर पार करू शकते.

रॉयल एनफील्डची ही बाईक 13 लिटरच्या फ्यूएल टँक क्षमतेसह येते.

भारतीय बाजारात या मोटरसायकलची किंमत 1.37 लाख रुपयांपासून सुरू होते.