झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची आज ईडी चौकशी होणार आहे. (Photo Credit : PTI)
हेमंत सोरेन यांनी ईडीकडून चौकशीसाठी समन्स देण्यात आलं असून त्यांच आज दुपारी 1 वाजता चौकशी होणार आहे. (Photo Credit : PTI)
ईडी पथकाने नुकतीच हेमंत सोरेन यांच्या निवासस्थानी छापेमारी केली, मात्र त्यावेळी सोरेन तिथे उपस्थित नव्हते. (Photo Credit : PTI)
हेमंत सोरेन मागील 40 तासांपासून गायब होते, त्यानंतर आता ते ईडीसमोर हजर होणार असल्याची माहिती आहे. (Photo Credit : PTI)
दरम्यान, चौकशीनंतर हेमंत सोरेन यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते, असं सांगितलं जात आहे. (Photo Credit : PTI)
झारखंडमधील जमीन घोटाळ्याशी संबंधित कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात चौकशीसाठी ईडीचे पथक नुकतीच हेमंत सोरेन यांच्या बंगल्यावर पोहोचले होते. (Photo Credit : PTI)
ईडीने बंगल्यातून हरियाणा क्रमांकाची बीएमडब्ल्यू कार आणि रोख रकमेसह काही महत्त्वाची कागदपत्रेही जप्त केली आहेत. (Photo Credit : PTI)
ईडीने नोटीस जारी केल्यानंतर 29 जानेवारीपासून सोरेन संपर्कात नव्हते. (Photo Credit : PTI)
ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, हेमंत सोरेन यांच्या बंगल्यातून 36 लाख रुपये रोख जप्त करण्यात आले असून, दोन आलिशान कारही जप्त करण्यात आल्या आहेत. (Photo Credit : PTI)
ईडी पथकाने सुमारे 13 तास बंगल्यात छापेमारी केली. (Photo Credit : PTI)